June 27, 2022

महाराष्ट्रातील पूरग्रस्त जिल्ह्यांना महा विकास आघाडी सरकार तर्फे तातडीने मदत, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे परिस्थितीवर जातीने लक्ष

1 min read

आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि जाहिराती परखड व निर्भिड पने संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क करा.संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक, महाराष्ट्र न्यूज ,9158417131

महाराष्ट्र न्यूज ,जगदीश का. काशीकर ,मुंबई _

राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीवर मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे व उपमुख्यमंत्री ना.अजित पवार जातीने लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.अदितीताई तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड.अनिल परबसाहेब , सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंतसाहेब , साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटीलसाहेब , राज्यमंत्री शंभूराज देसाईसाहेब , आमदार अनिकेतदादा तटकरे, आ.भरत गोगावले, आ.भास्कर जाधवसाहेब , आ.शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरेसाहेब आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पूरस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे तसेच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत.

 

कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटीलसाहेब स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.

 

अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालिन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव व मदतकार्यात सहकार्य करावे. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.