June 27, 2022

लोहनेर येथील मुस्लिम बांधवांचे कबरस्थान स्वच्छ करून अतिक्रमण हटविण्याची मागणी

1 min read

निर्भिड आणि रोखठोक पने आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी आणि जाहिरात महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी तात्काळ संपर्क करा , संपर्क : भारत पवार , मुख्य संपादक , महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131.

महाराष्ट्र न्यूज _ मनोज देशमुख , लोहणेर _

देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील मुस्लिम बांधवांनी मुस्लिम स्मशानभुमी भोवताली होणारे अतिक्रमण व स्वच्छते बाबतची मागणी व निवेदन येथील सर्व मुस्लिम बांधवानी  लोहनेर ग्रामपंचायतीला दिले. या निवेदनानुसार या मुस्लिम बांधवाचे अनेक वर्षांपासून पवित्र स्मशानभुमी  कब्रस्तानात अस्तित्वात आहे.

समाजातील एखादी मयत घटना झाली असेल येथील स्थानिक मुस्लिम समाज व नातेवाईक दफनविधी साठी येत असतात परंतु दफनविधी करण्यासाठी तात्पुरती स्वच्छता करावी लागते त्यामुळे बाहेरुन येणाऱ्या नातेवाईक, आपत्तेष्ट तीव्र नाराजी व्यक्त करतात तसेच आजुबाजुला उपद्रवी प्राण्यांच्या वावर आहे. व त्या मुळे सर्वत्र दुर्गंधी झालेली आहे. या मुळे समाजाच्या भावना दुखावल्या जातात.

तरी पवित्र अशा धार्मिक दफनभूमी जवळ अतिक्रमण काढुन आसपास कायमस्वरूपी स्वच्छता राहील अशी व्यवस्था करावी व मुस्लिम बांधवाना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.