नवी मुंबईतील विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची मागणी

0
35

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_

नवी मुंबईतील विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी कालच इथले स्थानिक प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र यांनी मानवी साखळी आंदोलन केले होते त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही हीच मागणी केली आहे.

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा.  पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषवलेल्या दि. बा. पाटील यांनी लोकसभेत चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांचे समाज भूषण दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी आंबेडकरांनी केली आनवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_
नवी मुंबईतील विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्यासाठी कालच इथले स्थानिक प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्र यांनी मानवी साखळी आंदोलन केले होते त्यात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही हीच मागणी केली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी केली आहे. नवी मुंबईच्या इतिहासात दि. बा. पाटील यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. नवी मुंबईसाठी ज्या भूमिपुत्रांनी जमिन दिल्या त्या प्रकल्पग्रस्तांच्या न्याय्य हक्कांसाठी जो लढा झाला, त्याचे नेतृत्व पाटील यांनी केले होते. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात देखील त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. ओबीसींच्या जागृती व हक्कांसाठी संघटित झालेल्या ओबीसी चळवळीचे ते लढाऊ नेते होते. पनवेलचे नगराध्यक्षपद भूषवलेल्या दि. बा. पाटील यांनी लोकसभेत चार वेळेस रायगड जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. तसेच महाराष्ट्राच्या विधानसभेत त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद भूषविले आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक भूमिपुत्रांचे समाज भूषण दि. बा. पाटील यांचे नाव विमानतळाला देण्याची मागणी अत्यंत रास्त आणि न्याय्य आहे. पूर्वजांकडून मिळालेल्या प्राणप्रिय जमिनी विमानतळासाठी दान देणाऱ्या भूमिपुत्रांच्या भावनांची कदर राज्यकर्त्यांनी केली पाहिजे. त्यामुळे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी आंबेडकरांनी केली आ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here