देवळा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना कायद्याचे राहिले नाही भान वाळू तस्कर ठरले महान, वाळू तस्कर रात्री अकरा नंतर करतात कमाई प्रशासकीय अधिकाऱ्यांनी केली आर्थिक भलाई ? वाळू तस्करां विरुद्ध का नाही झाली आजपर्यंत कारवाई ? _ भारत पवार
1 min read
नासिक :क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _ नासिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या उजव्या बाजूला असलेल्या पेट्रोल पंपाच्या बाजूने तीन ठिकाणी वाळू माफियांनी आणि त्यांचे कामगार व ट्रॅक्टर यांनी अक्षरशा धुमाकूळ घातला असून रात्री अकरा वाजे नंतर चोरटी वाहतूक रात्रभर सुरुच असते.त्यामुळे ह्या परिसरात राहणारे मजूर नागरिक व महिला यांच्या झोपा उडाल्या तर आहेतच परंतु वाळू तस्कर वाळूची बेकायदेशीर आणि चोरटी वाहतूक गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत तरीही देवळा येथील तहसील अधिकारी ,पोलिस निरीक्षक यांनी डोळेझाक केली असून अद्याप पावेतो वाळू माफियांविरुद्ध कारवाई केलेली नाही. उलट संबंधित अधिकाऱ्यांनी सढळ हाताने रान मोकळे करून दिल्याने रात्रभर ट्रॅक्टर वाळू वाहतूक बेकायदेशीररित्या देवळा येथे पोहचत आहे.हे आज पर्यंत तहसील अधिकारी आणि सर्व कर्मचारी किंवा भरारी पथक तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना का दिसत नसेल ? मग हे अधिकारी स्थानिक हेड कॉटर ला राहत नाहीत का ? की नासिक हून ये – जा करतात ? का मग आर्थिक भलाई करून डोळेझाक करतात ? या सारखे प्रश्न पडले असून कारवाई करण्या साठी कायद्याच्या अधिकाऱ्यांना धाक का पडला ?असा सवाल अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार कायदा महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष ,पत्रकार _भारत पवार यांनी वरील अधिकाऱ्यांना प्रसिध्दी माध्यमातून विचारला असून कायदा फक्त सर्वसामान्य आणि गरीब यांचेवरच कारवाई करण्या साठीच ठेवला आहे का ? असा संतप्त सवालही पवार यांनी उपस्थित केला असून कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध आता मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री , गृहमंत्री ,जिल्हाधिकारी , जिल्हा पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी यांनी लक्ष देऊन वाळू माफियांना रान मोकळे कसे ? आपणास आज पर्यंत कळले कसे नाही ? तुमचे भरारी पथक आहे की जाऊद्या पथक आहे ? याबाबत शहानिशा करून संबंधित दोषींविरुद्ध तसेच वाळूमाफियांनी आज पर्यंत किती ब्रास ? किंवा किती टन वाळू चोरली आणि पोट कल्याण केले याबाबत चौकशी करून त्यांचे विरूध्द कारवाई करून वाळू माफियांना कायमचे व्यसन घालावे अशी मागणी भारत पवार आणि संतापलेले नागरिकांनी केली आहे.गेल्या अनेक दिवसांपासून ह्या भागातून ट्रॅक्टर चे ट्रॅक्टर वाळू ची वाहतूक रात्रभर सुरुच असते.चोरट्या वाहतुकीचा परिणाम शासनाच्या तिजोरीवर नक्कीच पडला असून शासनाचा अनेक कोटीचा महसूल बुढविण्यात वाळू माफिया तरबेज निघाले तसेच वाळू उपशामुळे शेतकऱ्यांच्या विहिरी तळ गाठण्याचा मार्गावर असून शेतकऱ्यांत संताप व्यक्त केला जात आहे.त्यामुळे लोहणेर भागात सुध्धा अनेक शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.देवळा महसूल व पोलिस अधिकाऱ्यांना कायद्याचे आणि स्वतःचे कर्तव्याचे राहिले नाही भान वाळू तस्कर ठरले महान अशी चर्चा आता सर्वत्र होऊ लागल्याने अधिकाऱ्यांनी वाळू माफियां कडून आर्थिक भलाई केल्या मुळेच अधिकारी सुस्त आणि मस्त झाले अशी संतप्त प्रतिक्रिया ह्या भागात उमटत आहे.तर वाळू माफियांना कोणाचा वरद हस्त लाभलाय की त्यामुळे दिवसभर दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट करून मजुरांच्या झोपा ह्या महाशयांनी उडवल्या की रात्रभर ट्रॅक्टर चा दणदणाट , खणखणाट जोराचा आवाज रात्रभर असल्यामुळे मजूर वर्ग सुध्धा त्रासलेल्या आहे.तरी आता वरील अधिकारी वाळू माफियांविरुद्ध काय भूमिका घेतात याकडे जनतेचे लक्ष लागले आहे.
