June 27, 2022

हंडा भर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना करावी लागते जीवघेणी भटकंती

1 min read

*हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची मोठी कसरत…

भारत पवार _ मुख्य संपादक _क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज , आपल्या परिसरातील,गावातील ताज्या घडामोडी ,जाहिराती महाराष्ट्रभर पोहोचविण्यासाठी तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात पत्रकार नियुक्ती करणे आहे. तात्काळ संपर्क करा, संपर्क : 9158417131 

बागलान प्रतिनिधी / अजय ठाकरे _

 

बागलाण*:- नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात असलेल्या गाव मानुर मधील बिरदवनपाड, मधील व इतर पाडे येथे पिण्याच्या पाण्याची भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गावामधील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागतेय. सध्या मे महीना सुरु असून बागलाण तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी कडक उन्हामध्ये महिलांना कोसोदुर पायपिट करावी लागत आहे. तालुक्यातील बिरदवनपाड, मानुर या गांवन भीषण पाणी टंचाई जाणवत असून गावापासून काही अंतरावरच मोठे धरण असून सुध्दा याचा फायदा गावकऱ्यांना होत नसल्याचे ग्रामस्थामधून बोलल्या जात आहे. धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था निर्माण झाली आहे. पाण्याच्या थेंबाथेंबा साठी महिलाना वनवन भटकंती करावी लागत आहे. तसेच जीव धोक्यात टाकून विहिरीतून किंवा खड्यातुण पाणी काढण्यासाठी सुध्दा महिला वर्ग मोठी कसरत करताना दिसून येत आहे.  येथील बोर हातपंप विहिरी यांनी तळ गाठलाय, गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरीवर किंवा  खड्यातुन पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची मोठी गर्दी नेहमीच होत असते. या ठिकाणी जवळपास  तळ गाठलेल्या विहिरीतुन पाणी काढण्यासाठी जीव धोक्यात टाकला जात आहे. तेव्हा कुठे तरी कुटुंबीयांची तहान भागवली जाते. आणि गावात असलेल्या नागरिकांवर प्यायला पाणी मिळत नाही म्हणून वनवन कोसोदुर भटकंती करण्याची वेळ आली आहे. परंतु ग्रामपंचायत व प्रशासनाकडून आतापर्यंत कुठलेही ठोस पाऊल उचलले नाही. गावातल्या विहिरी, हातपंप, बोअरने में महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठला आहे. येथील गावकऱ्यांनी मागील दहा वर्षापासून प्रशासनाकडे गावाला कायमस्वरुपी पाणी देण्यासाठी अनेक वेळा पाठपुरावा देखील केला. प्रशासन दरबारी आंदोलने केली. मात्र प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्यासाठी कुठल्याही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थामधून केला जात आहे. त्यामुळे आता तरी प्रशासनाने आमच्या भावना समजून पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी परिसरातील महिला व नागरिकांमधून जोर धरु लागली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.