मालेगाव महानगरपालिका शोक सागरात शिवसेनेच्या नगरसेविका कविता बच्छाव यांचे दुःखद निधन कॅम्प परिसर शोकमग्न
1 min read
भारत पवार मुख्य संपादक / डायरेक्टर क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131

मालेगाव : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ नेटवर्क _ बस झालं देवा अजून किती जीव घेता ? का हळूहळू असं करून सगळ्यांनाच नेता ? असे म्हणण्याची वेळ आता महाराष्ट्र सह नाशिक जिल्ह्यातील नागरिकांवर आली आहे. जिल्ह्यातील मालेगाव येथील शिवसेनेच्या तरूण नगरसेविका कविता किशोर बच्छाव यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाल्याने मालेगाव महानगरपालिका शोक सागरात बुडा ली असून कॅम्प परिसरात आणि पंचशील नगर येथे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.कविता बच्छाव यांनी प्रथमच शिवसेनेकडून तिकीट मिळवून दादासाहेब भुसे यांच्या आशीर्वादाने परंतु अत्यंत अटीतटीच्या सामन्यात प्रभाग एक मधून बाजी मारून निवडून आल्या होत्या. त्यांनी प्रथमच मालेगाव महानगरपालिकेत दमदार एंट्री केली होती .प्रथमच नगरसेविका होऊन सभापती होण्याचा बहुमान त्यांना मिळाला होता. स्वभावाने प्रेमळ, हसतमुख असणाऱ्या कविता बच्छाव यांचे अकाली जाणे शिवसेनेसह संपूर्ण प्रभागात नागरिक आणि महिलांच्या मनास चटका लावून गेल्याने येथे हळहळ व्यक्त केली जात आहे. कविता किशोर बच्छाव यांच्या पश्चात दोन लहान मुलं ,पती आणि सासरे असा छोटासा परिवार असल्याने परिसरात नागरिकांच्या मनास वेदना होत असल्याने असे महाभयानक दुःख पेलण्याची शक्ती बच्छाव कुटुंबीयांना तथागत भगवान गौतम बुद्ध देवो अशी
क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “आणि पवार परिवार , अहिरे परिवार ,यशोद परिवार मालेगाव कॅम्प, प्रकाश हाउसिंग सोसायटी यांच्यातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत अर्थातच कोरोणा मुळे होणारे मृत्यू तांडव कधी थांबणार ? ह्या चिंतेत जनता असून तीतकीच भयभीत सुद्धा झाली आहे. म्हणून” बस झालं देवा अजून किती जीव घेता? का हळूहळू असं करून सगळ्यांनाच नेता? असा आर्त स्वर जनता व्यक्त करू लागली आहे.