आता कोविड रुग्णांना नातेवाईकांशी रुग्णालयातून संपर्क करता येणार ,मुंबई आयुक्तांची कामगिरी

0
25

भारत पवार मुख्य संपादक संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,मो.9158417131                        मुंबई  – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_नवी मुंबईतील
कोव्हीड केअर सेंटरमध्ये कोणतीही  सौम्य लक्षणे असणा-या कोव्हीड पॉझिटिव्ह व्यक्तींना दाखल केले जात असून त्यांना आपल्या मोबाईलव्दारे त्यांच्या कुटुंबियांशी संपर्क साधण्याची सुविधा आहे. महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन सेंटर येथील डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटरमध्येही रूग्णांची आरोग्यस्थिती कुटुंबियांना कळविण्यासाठी कॉ़ल सेंटर कार्यन्वित आहे.

तथापि जे रूग्ण आयसीयू बेड्सवर उपचार घेत आहेत अथवा व्हेंटिलेटरवर आहेत त्यांच्या कुटुंबियांना आपल्या रूग्णाची आरोग्य स्थिती जाणून घेण्यात अडचण येत होती. या गोष्टीचे महत्व लक्षात घेत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी महानगरपालिकेच्या वतीने आयसीयू बेड्स व व्हेंटिलेटर्सची सुविधा असलेल्या नेरूळच्या डॉ. डि.वाय.पाटील हॉस्पिटलमध्ये तसेच कामोठे येथील एमजीएम रूग्णालयामध्ये विशेष कक्ष स्थापन केला असून तेथील कॉ़ल सेंटरमधून दररोज रूग्णांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात येत असून त्यांना त्यांच्या रूग्णाच्या विद्यमान आरोग्य स्थितीची माहिती देण्यात येत आहे.

डॉ.डि.वाय.पाटील रूग्णालयातील कॉल सेंटरमधून दररोज 200 हून अधिक रूग्णांच्या नातेवाईकांना दूरध्वनी करून त्यांच्या रूग्णाची आरोग्य स्थिती कळविली जात आहे. याशिवाय कुटुंबियांना आणखी माहिती हवी असल्यास दररोज दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत तेथील फ्ल्यू क्लिनीकमध्ये डॉक्टरांचा समुह नातेवाईकांशी संवाद साधण्यासाठी उपलब्ध असतो. अशीच प्रणाली एमजीएम रूग्णालय कामोठे येथेही दुपारी 2 ते 3 या वेळेत राबविली जात आहे.

कोव्हीड पॉझिटिव्ह रूग्णाची प्रत्यक्ष भेट घेणे त्यांच्या कुटुंबियांना कोव्हीड प्रतिबंधात्मक नियमांमुळे शक्य नसल्याने विशेषत्वाने आयसीयू व व्हेंटिलेटर बेडवर असलेल्या आपल्या रूग्णाच्या प्रकृतीविषयी चिंता व उपचारांविषयी जिज्ञासा दूर करण्याच्या दृष्टीने हे कॉल सेंटर रूग्णांच्या नातेवाईकांना सर्वार्थाने मानसिक दिलासा देणारे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here