June 27, 2022

देवळा सेतू कर्मचाऱ्यांचा अडेलतट्टूपणा तर सेतु संचालकांचा कानाडोळा आम्हास राहिले नाही भान, झाले बेभान…यामुळे विद्यार्थ्यांचे आयुष्याचे नुकसान करणाऱ्या सेतू संचालक आणि कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करण्याची प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांचेकडे मागणी _भारत पवार

1 min read

भारतपवार_ मुख्य संपादक /संचालक क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : 9158417131

देवळा _ महाराष्ट्र न्यूज ,स्पेशल _आम्हास राहिले नाही भान झाले बेभान केले विद्यार्थ्यांचे नुकसान याची प्रचिती नुकतीच आली यापूर्वी अशा कित्येक विद्यार्थ्यांना नुकसान सोसावे लागले असेल हा मोठाा प्रश्न म्हणावा लागेल. नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील देवळा येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांच्या अधिकारात असलेल्या देवळा सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा अज्ञानाचा आणि अडेलतट्टूपणा चा कळस गाठल्याने एका विद्यार्थ्यास आयुष्याचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरलेले सेतू संचालक आणि कर्मचारी यांची तात्काळ हकालपट्टी करून नव्याने अनुभवी उच्चशिक्षित सेतू संचालक आणि कर्मचारी नियुक्त करावेत जेणेकरून भविष्यात कोणत्याही विद्यार्थी _ विद्यार्थिनीचे नुकसान होणार नाही अशी दक्षता घेणाऱ्या सेतू संचालकाची नियुक्ती करण्याची मागणी देवळा _चांदवड विभागाचे प्रांत अधिकारी देशमुख आणि तहसीलदार शेजुळ, देवळा यांचेकडे महाराष्ट्र न्यूज चे संपादक / संचालक  तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि माहिती अधिकार का . महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष भारत पवार यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की ,देवळा येथील सेतू कार्यालयात महिरे प्रफुल रा.दहिवड , ता देवळा, ह.मु.घाटकोपर, याने जातीचा दाखला मिळण्यासाठी दिनांक 18/ 12 / 20 रोजी सर्व कागदपत्रांसह फाईल दाखल केली होती. त्यानुसार सर्व चौकशी निशी प्रांत अधिकारी यांनी अवघ्या दहा दिवसात जातीचा दाखला दिला सुद्धा परंतु महिरे प्रफुल च्या आजोबाचे नाव टाईप करताना देवळा की चांदवड ? कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून चुकीचे झाले. नावातील ही किरकोळ दुरुस्ती देवळा येथील सेतू कर्मचाऱ्यांच्या लक्षात लागलीच आणून देऊन सुद्धा गेल्या तीन-चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांनी सदर दुरुस्ती करून देण्याची मेहनत घेतली नाही किंवा सदर दाखला पुढील कार्यालयातील अधिकार्‍यांकडे पाठविण्याची तसदी घेतली नाही त्यामुळे त्यांचा अज्ञानी पणा आणि अडेलतट्टूपणा मुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले असून आणि याकामी सेतू संचालक यांचे वेळोवेळी लक्ष सेतू कर्मचाऱ्यांच्या कारभाराकडे देण्याऐवजी दुर्लक्ष अर्थाथात कानाडोळा झाल्याचे दिसून येते त्यामुळे विद्यार्थ्यांच्या दाखल्या विषयी निष्काळजीपणा आणि आपल्या कर्तव्याचेे भान विसरून बेभान झालेल्या देवळा सेतू संचालक आणि कर्मचाऱ्यांची योग्य ती चौकशी करून नवीन अनुभवी उच्चशिक्षित सेतू संचालक आणि सेतू कर्मचारी नियुक्तत करावेत आणि प्रफुल महिरे याचे आजोबाच्या नावाची दुरुस्ती करून त्यास जातीचा दाखला विनाविलंब देण्यात यावा अशीही मागणी संपादक संचालक भारत पवार यांनी निवेदनाद्वारे प्रांत अधिकारी आणि देवळा तहसीलदार तथाा कार्यकारी यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.