June 27, 2022

देवळा सेतू कर्मचाऱ्यांचा अडेलतट्टूपणा आणि शेती संचालकाचे दुर्लक्ष यामुळे विद्यार्थ्याचे आयुष्याचे नुकसान करणाऱ्या सेतू संचालक आणि कर्मचाऱ्यांची हकालपट्टी करून नवीन अनुभवी, उच्चशिक्षित कर्मचारी नेमण्याची प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांचेकडे मागणी _ भारत पवार

1 min read

देवळा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ”  विशेष ” _  नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील देवळा सेतू कार्यालयातील कर्मचारी वर्गाचा अडेलतट्टू पना आणि अज्ञानाचा कळस गाठल्याने एका विद्यार्थ्यास आयुष्याचे नुकसान देवळा येथील सेतू कर्मचाऱ्यांनी आणि सेतू संचालकाने केल्याचे त्यांच्या कारभारावरून स्पष्ट होते आहे .त्यामुळे विद्यार्थ्यां आणि त्याच्या कुटुंबात संतापाची लाट उसळली असून याबाबत ” महाराष्ट्र न्यूज ” चे मुख्य संपादक /संचालक  तथा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि नाशिक जिल्हा माहिती अधिकार का. महासंघाचे कार्याध्यक्ष भारत पवार यांनी या प्रकरणाविषयी संबंधित सेतू संचालक आणि सेतू कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यां ची कायमची हकालपट्टी करून नवीन अनुभवी उच्चशिक्षित सेतू संचालक आणि कर्मचारी नेमावेत अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे  प्रांताधिकारी देशमुख आणि तहसीलदार शेजुळ यांचेकडे केली आहे. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांचे आयुष्याचे नुकसान होणार नाही याची दक्षता नवीन नियुक्त केलेल्या सेतू संचालक आणि कर्मचारी घेतील असेही पवार यांनी निवेदनात म्हटले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार देवळा येथील सेतू कार्यालयात महिरे प्रफुल रा. दहिवड याने दि.१८/ १२ / २० रोजी सर्व कागदपत्रांसह जातीचा दाखला मिळणेबाबत फाईल दाखल केली होती त्यानुसार प्रांताधिकारी चांदवड – देवळा विभाग यांनी सर्व चौकशी निशी अवघ्या दहा दिवसात जातीचा दाखला दिला परंतु महिरे प्रफुल च्या आजोबाचे नाव देवळा की चांदवड ? कर्मचाऱ्यांकडून टाईप करताना चुकीचे झाले. नावातील ही किरकोळ दुरुस्ती देवळा सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यास तात्काळ निदर्शनास आणून देऊन सुद्धा गेल्या तीन ते चार महिन्यांपासून नावातील किरकोळ दुरुस्ती साठी वरील दाखला देवळा सेतू कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पुढील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडे किंवा कार्यालयाकडे पाठविण्याची तसदी घेतली नाही अथवा दुरुस्तीही करून दिली नाही गेल्या तीन ते चार महिन्यांपासून सेतू संचालक यांचेही याकामी सेतू कार्यालयाकडे आणि कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या कामकाजाकडे लक्ष नसल्याचे स्पष्ट होते त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मेरी सुनो म्हणून जातीचा दाखला जैसे थेच ठेवला आणि अडेलतट्टूपणा कायमचा जवळ बाळगल्याने विद्यार्थ्याचे भविष्याचे नुकसान करण्यास कारणीभूत ठरले. त्यामुळे देवळा सेतू कार्यालयाचे संचालक आणि सेतू कार्यालयातील सर्व कर्मचारी विद्यार्थ्याच्या नुकसानीस कारणीभूत ठरून याबाबत त्यांची चौकशी करून त्यांचेवर कडक कारवाई करून त्यांना कायमचे निलंबित करून देवळा येथील नव्याने सेतू संचालक आणि सेतू कर्मचारी नियुक्त करावेत अशी मागणी संपादक / पत्रकार भारत पवार यांनी चांदवड – देवळा विभागाचे प्रांताधिकारी आणि देवळा येथील तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे केली असून, महिरे प्रफुल याच्या प्राप्त झालेल्या जातीच्या दाखल्या वरील आजोबा च्या नावाची दुरुस्ती करून दाखला तात्काळ देण्यात यावा अशीही मागणी पवार यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.