राज्याचे नवीन गृह मंत्री दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती

0
44

भारत पवार : मुख्य संपादक / संचालक _ क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,9158417131  , मुंबई मंत्रालयातून _ शोभा बल्लाळ ,उपसंपादक _ अनिल  देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री .
राज्याच्या नव्या गृहमंत्रीपदी राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे पाटील यांची वर्णी लागली आहे.दिलीप वळसे पाटील यांच्याकडे याआधी उत्पादन शुल्क विभागाची जबाबदारी होती.मात्र गृहमंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ही जबाबदारी अजित पवार यांच्या कडे  दिली जाऊ शकते.
दिलीप वळसे पाटील हे राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते असून त्यांना विधिमंडळाच्या कामकाजाचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे स्वीय सहायक म्हणून काम केले आहे.दिलीप वळसे पाटील यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1956 रोजी झाला.1990 साली आंबेगाव तालुक्यात युवा नेतृत्व म्हणून दिलीप वळसे पाटील यांचा उदय झाला.वडील दत्तात्रय गोविंदराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी त्यांनी राजकारणी सुरवात केली.
दिलीप वळसे पाटील हे आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून सलग सातवेळा आमदार झाले आहेत.
२००9ते 2014 या कालखंडात त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली होती.
युतीचे सरकार असताना विधानसभेत चमकदार कामगिरी केल्याने त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरष्कार मिळाला.वैद्यकीय ,शिक्षण ,उच्च व तत्र शिक्षण विभाग ,ऊर्जा ,उत्पादन शुल्क,कामगार विभागासाराख्या महत्वाचे खात्याचे मंत्री म्हणून काम सांभाळले आहे.मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली होती.
राजकीय उलथापालथीच्या काळात आणि भाजपकडून आक्रमकपणे हल्ला होत असताना विधानसभा अद्यक्ष म्हणून दिलीप वळसे पाटील यांनी महत्वाची भूमिका पार पाडली. त्यांच्या विधिमंडळ कामाच्या आणि कायदेशीर प्रक्री याच्या खंडांनखडा महितीमुळे आघाडी सरकारला चांगलंच बळ मिळालं होतं.
मंत्रिपदि कार्यरत असताना महत्वपूर्ण धोरणात्मक व उल्लेखनिय निर्णय घेतले.त्यामुळे प्रामुख्याने महाराष्ट्र ज्ञान महामंडळ या कंपनीची स्थापना करून गतीने विकास केला.त्यामुळे राज्यात संगणक साक्षरता वाढीचे महत्वाचे कार्य होऊ शकते विदुयत कायदा 2003 ची राज्यात प्रभावी अंमलबजावणी केली.ऊर्जा क्षेत्रात राज्याला योग्य दिशा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य विदुयत मंडळाचे विभाजन करून सुत्रधारी कंपनी,म्हानिर्मिती,महापारेषण व महावितरण या चार कंपन्यांची स्थापना केली व ऊर्जा विकासासाठी रोडम्याप केला,6000 मेगावाटचे प्रकल्प उभारण्याचे व विद्युत पायाभूत सुविधा निर्माण करण्याचे काम केले.2009ते 2014 अद्यक्ष ,महाराष्ट्र विधानसभा या काळात विधान मंडळाचे कामकाज योग्य पद्धतीने चालावे यासाठीणेक महत्वपूर्ण निर्णय घेतले.
2012 -2013 मद्ये महाराष्ट्र विधान मंडळाच्या अमृत महोत्सव समारंभाचे भारताच्या राष्ट्रपती महामाहीम प्रतिभा ताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजन केले .तसेच यशवंतराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या जन्मशताब्दी निमित्त प्रदर्शन व चर्चा सत्राचे आयोजन ऑक्टोबर 2019 मद्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here