June 27, 2022

शेतकऱ्यांसाठी शास्त्रज्ञ झगडतोय लालफितीच्या कारभाराची लढा…!

1 min read

भारत पवार , संपादक /संचालक _क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज ,9158417131

सटाणा : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रा. किरण कुमार जोहरे_ मुंबई चे रडार वर्ग करून नाशिक व औरंगाबादला एक्स बॅंड डॉप्लर रडारची थेट पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांना भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांचे साकडे .!

नाशिक एकट्या मुंबईला ५ डॉप्लर रडार देण्यापेक्षा उत्तर महाराष्ट्रासाठी नाशिक जिल्ह्य़ात आणि मराठवाड्यासाठी औरंगाबादला मध्यवर्ती ठिकाणी तातडीने एक्स बँड डॉप्लर रडार त्वरित हस्तांतरित करावे अशी मागणी भौतिकशास्त्रज्ञ व हवामान आंतरराष्ट्रीय ख्यातीचे हवामान व ढगफुटी तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनीसार्वजनिक हिताच्या आणि राष्ट्रीय हिताच्या आपत्ती व्यवस्थापनांसाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संपर्क साधून केली आहे.

गारपीट, ढगफुटी आदी एक्स्ट्रीम इव्हेंटस पासून कृषी नुकसान टाळण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी हे पाऊल अत्यंत तातडीने उचलणे आवश्यक आहे. डॉप्लर रडारची अचूकता वाढविण्यासाठी विशाखापट्टणम आणि कोलकता येथे प्रत्यक्ष तांत्रिक अभ्यास करण्याची संधी मिळाली होती यामुळे आपण ही गोष्ट खात्रीने सांगू शकतो की डॉप्लर रडार ढग सरकत असतानाही अचूक माहिती देते असे ही हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

२०१४ साली महाराष्ट्रातील २९ जिल्ह्यात गारपीट होऊन नुकसान झाले. त्यावर हवामान बदल समजून घेत उपाय झाले तर निश्चित व थेट फायदा शेतकऱ्यांना मिळेल. ‘नेशन फर्स्ट’ साठी एक वैज्ञानिक आणि तसेच नागरिक म्हणून आपण एक कर्तव्य पार पाडत आहे असेही प्रा किरणकुमार जोहरे यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय हित जपण्याबरोबरच आणि मानवी संस्कृती साठी अन्नधान्याची होणारी नासाडी टाळण्यासाठी देखील ते गरजेचे आहे असे ही प्रा किरणकुमार जोहरे म्हणाले.

नाशिक जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी म्हणजे चांदवड तालुक्यातील तर औरंगाबाद येथील सिल्लोड तालुक्यात पिंपळदरी गावी हे बसविण्यात यावे यामुळे शेतकर्यांना व सर्वसामान्य जनतेला ढगफुटी, पाऊसा बरोबर पडणार्या गारा तसेच गारपीट यांचा अलर्ट देणे शक्य होईल असे ही प्रा किरणकुमार जोहरे यांनी सांगितले. प्रा किरणकुमार जोहरे हे पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या पुणे येथील इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ ट्रॉपिकल मेटियरोलाॅजी (आयआयटीएम)चे माजी शास्त्रज्ञ आहेत. भारतात किमान दहा वर्षांपूर्वी प्रा किरणकुमार जोहरे यांनी विनामोबदला व विनाअनुदानित ‘अंदाज नव्हे माहिती!’ चे नवे पर्व सुरू केले होते.

एक्स बॅंड डॉप्लर रडारची मराठवाडा व उत्तर महाराष्ट्राला आवश्यकता स्पष्ट करतांना भौतिकशास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांनी पुढिल कारणे दिली:-

१. राज्यातील मान्सून व चक्रीवादळांच्या बदलत्या पॅटर्नमुळे तालुका व गाव निहाय वातावरण बदलले आहे. ढगफुटी व गारांच्या पावसाची पूर्वसूचना मिळाली तरच शेतकरी व शेती व उद्योग याद्वारे भारतीय अर्थव्यवस्था वाचेल आणि वाढेल. कारण अचूक हवामान माहिती आगाऊ मिळाल्याने शेतकर्‍यांना सुयोग्य नियोजनातून संभाव्य नुकसानीवर मात करणे शक्य होणार आहे.

३. मान्सूनचा पॅटर्न बदल आणि महाराष्ट्र राज्या विशेषतः उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात दुष्काळी आणि कमी पावसाचे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात आता ढगफुटी किंवा फ्लॅश फ्लड म्हणजे ताशी १०० मिमी / तास किंवा त्याहून अधिक दराने पाऊस गारपीट वाढली आहे ज्यामुळे तालुका व गाव पातळीवर अंदाज नव्हे तर हवामानाची अचूक माहिती पोहचणे आवश्यक आहे.

३. ढगातील कणांची माहिती मिळते यामुळे ही पावसाची खात्रीशीर माहिती देणारी डॉप्लर रडार यंत्रणा ही जगभर आपत्कालीन यंत्रणा म्हणून सर्व प्रगत देश अचूक हवामान माहिती व अलर्ट अतिशय प्रभावीपणे वापरत आहेत. डॉप्लर रडार विद्युत चुंबकीय लहरी ढगांवर सोडते. डॉप्लर रडारच्या साहाय्याने पावसाची, ढगफुटीची, गारपिटीची माहिती चार ते सहा तास आधी अगदी सहज मिळू शकते. रडारच्या परिघात पाऊस, गारपीट किंवा ढगफुटी कुठे कुठे होणार ढग वार्यावर स्वार होत कोणत्या दिशेला जात आहेत आणि त्यात किती पाणी कोणत्या स्वरुपात आहे हे लिक्विड वाॅटर कंटेट (एलडब्लूसी) या घटकांचा चित्र रूप अभ्यास करुन समजते. किमान एक तास आधी १०० टक्के खात्रीपूर्वक अचूक सांगता येते ज्यामुळे ही यंत्रणा देवदूत बनत लोकांचे प्राण वाचवते.

४. एक्स बॅंड डॉप्लर रडार हे ढगांचा एक्स-रे काढते असे म्हणावे लागेल. सुयोग्य वापराने ढगांकडून परतणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरी ढगांतील अगदी बोटाच्या पेरा एवढया भागातील बाष्प, बर्फ कण तसेच पाण्याच्या थेंबांच्या आकार व प्रकार अचूक, तसेच ढगफुटींची माहिती ही एक्स बॅंड वर मिळते. रडार कोणत्या फ्रिक्वेन्सीवर आॅपरेट होते त्यानुसार त्याचे वर्गीकरण विविध बॅंड मध्ये करण्यात आले आहे आणि एक्स बॅंड म्हणजे ८ ते १२ गिगा हर्टझ फ्रिक्वेन्सी वर चालणारे डाॅप्लर रडार होय.

५. राज्यात मुंबई, महाबळेश्वर, सोलापूर आणि नागपूर या चार ठिकाणी हे रडार कार्यान्वित आहे. या रडारमुळे भौगोलिक प्रदेशानुसार २५० ते १०० किमी परिघातील अचूक गारपीटीची अंदाज नव्हे तर खरीखुरी माहिती प्राप्त होते. यावर्षी मुंबईला आणखी चार रडार दाखल होणार आहेत. मुंबईला नव्याने दाखल होणाऱ्या या चार एक्स बॅंड डाॅप्लर रडारांनंतर आधीचे एक रडार जोडून ही संख्या पाच होईल. यापैकी किमान एक-एक तरी तातडीने उत्तर महाराष्ट्रातील कृषिप्रधान जिल्हांना व्हावा यासाठी द्राक्ष व कांदा, पालेभाज्या आदींनी संपन्न व भारतीय अर्थव्यवस्थेत योगदान करणार्या नाशिक जिल्हात तसेच मराठवाडयातील औरंगाबाद जिल्ह्य़ात वर्ग होणे आवश्यक आहे. यासाठी लोकप्रतिनिधी यथायोग्य सकारात्मक पावले उचलली तर नक्कीच शेतकर्यांना फायदा होईल असे ही भौतिकशास्त्रज्ञ व हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांचे म्हणणे आहे.

कोण आहेत ?  प्रा. किरण कुमार जोहरे …!

४ आॅकटोबर २०१० रोजी पुणे येथील ढगफुटी म्हणजे ९० मिनिटात १८२ मिलीमीटर पाऊस झाला होता व ४ लोक दगावले होती त्या ढगफुटीचा अलर्ट दुपारीच होण्याआधीच देऊन त्यांनी हजारो लोकांचे प्राण वाचविले होते.

४ जून २०२० ला रायगड जिल्ह्यात येथे धडकलेले निसर्ग परंतु ते उत्तर महाराष्ट्रात धडकणार अशा अफवा टिव्ही व इतर सोशल मीडियावर प्रसारित होत असतांना प्रा किरणकुमार जोहरे यांचा सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्राला या वादळाचा कुठलाही धोका नाही तुम्ही शांत पणे निर्धास्त होऊन झोपा असा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा शेतकरी व सामन्य जनतेचा जीव भांड्यात पडला होता.

१९ सप्टेंबर २०२० रोजी रात्री ९ वाजता हवामान तज्ज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांचा नाशिक जिल्ह्य़ातील होणार्या ढगफुटींबाबत अलर्ट मेसेज नाशिक जिल्हा व संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाला. नाशिक जिल्हातील चांदवड, निफाड (शिवडी), नांदगाव (मनमाड) कळवण (वणी) या चार तालुक्यात ढगफुटी झाली व असंख्य शेळ्या मेंढ्या वाहून जात आर्थिक नुकसान झाले होते मात्र प्रा जोहरे यांनी दिलेल्या अलर्ट मुळे लोक नदीपात्रापासून दूर गेले व सुयोग्य काळजी घेतल्याने जीवितहानी झाली नाही. हवामान शास्त्रज्ञ प्रा किरणकुमार जोहरे यांचा दांडगा अनुभव पाहता प्रशासनाने देखील त्याची तातडीने दखल घेतली. अलर्ट व जनजागृतीने आणि नाशिक जिल्ह्यातील हजारो लोकांचे जीव वाचले, लाखोंचे नुकसान टळले.

प्रा किरणकुमार जोहरे यांनी २६ नोव्हेंबर २०२० ला धडकलेल्या ‘निवर’ चक्रीवादळाचा आगाऊ अलर्ट आणि माहिती ७ नोव्हेंबर २०२० रोजीच म्हणजे १९ दिवस आधी दिली होती हे देखील आता स्पष्ट झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.