माळवाडी(देवळा)गावचे काशिनाथ अहिरे यांच्या मातोश्री सुमनबाई अहिरे यांचे निधन

0
14
  • माळवाडी _ क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _ नासिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील माळवाडी येथील रहिवासी असलेल्या कै.सुमनबाई भिवा अहिरे यांचे वृद्धापकाळाने नुकतेच दुःखद निधन झाले. पती कै.भिवा शामा अहिरे यांच्या सहकार्याने अत्यंत गरिबीतून त्यांनी संसाराचा गाडा पुढे हाकत आपले तीन मुलं व एक कन्या यांना शाळा शिकून लहानाचे मोठे केले. संसाराचा गाडा सुरळीत चालू असताना अचानक पती भिवा अहिरे यांची तब्येत बिघडली त्यांना पक्षघाताचा आजार झाला काही वर्ष अंथरुणावर पडत त्यांनी पत्नी सुमनबाई यांची साथ सोडली . मुल करती झाल्यामुळे आई सुमनबाई यांना फारसी मेहनत घावी लागली नाही.सगळ्यात लहान मुलगा आईची विशेष काळजी घेत होता.लहान सून माळवाडी गावची माजी सरपंच असल्याने सुमनबाई स खूप कौतुक होते मात्र सुमनबाई यांनी हे कौतुक त्यांच्या चेहऱ्यावर कधी दिसू दिले नाही की कधी गर्व केला नाही. त्याांचे पाय जमिनीवरच होते हे त्यांच्या स्वभावाचे विशेष सांगता येईल.सुमनबाई यांच्या पश्चात तीन मुल केदा ,आप्पा व काशिनाथ भिवा अहिरे ,तीन सूना,नातवंडे आणि मुलगी इंदुबाई व जावई असा मोठा परिवार आहे. कै.सुमनबाई अहिरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून अहिरे कुटुंबियाच्या दुःखात पवार परिवार सहभागी असून परमेश्वर त्यांना दुःख पेलण्याची शक्ती देवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..भारत पवार आणि पवार परिवार,माळवाडी( देवळा) , संपादक,महाराष्ट्र न्यूज ,आणि महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष _ अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती ,मो. 9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here