June 27, 2022

विजय वाघ ला कुटुंबातून काळाने हिरावून नेले… बंडूकाका बच्छाव व सुनील आबा गायकवाड संकटसमयी धावून आले ,अनाठाई खर्च टाळून गरजूंना मदत करणे हीच खरी शिवजयंती साजरी करणे _बंडूकाका बच्छाव

1 min read

मालेगाव : क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज ” _ भारत पवार यांचे कडून _  नासिक जिल्ह्यातील मालेगाव येथील कॅम्प भागातील पंचशील नगर , प्रकाश हाउसिंग सोसायटी येथील रहिवासी विजय अशोक वाघ (४२) यांचे अल्पशा आजाराने नुकतेच दुःखद निधन झाले घरातील पोशिंदा गेल्याने सहा माणसांचे कुटुंब उघड्यावर पडले वयोवृद्ध पिता अशोक वाघ ,नातवंडे ,सून असा परिवार पिता अशोक वाघ यांच्यावर सांभाळण्याची जबाबदारी येऊन पडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे कारण अशोक वाघ हे स्वतः अपंग असल्याने त्यांचे आजार पण, खाणे पिणे सून करीत असे. अशा परिस्थितीत सुनबाई चा पती विजय वाघ  आजारी पडणेे आणि काहीी दिवसातच काळाने त्याच्यावर झडप घालून कुटुंबातून हिरावून घेणे ही मोठी अघटित घटना असून परिसरात शोक व्यक्तत केला जात, आहे तर मालेगावचे एक भूषण अनाथांचे नाथ बनलेलेेेे संकट कोणतेही असो संकट समयी धावून जाणे आणि संकटकालीन व्यक्तीबरोबर राहून त्या संकट कालीन व्यक्तीस किंवा कुटुंबास मदत करणे किंवा आधार देणे असे धर्मराज अर्थात पित्याची भूमिकाा बजावणारे बारा बलुतेदार मित्र मंडळाचेे संस्थापक बंडूकाका बच्छाव ,नगरसेवक सुनील आबाा गायकवाड यांनी आपल्या पदाधिकाऱ्यां सह आणि कार्यकर्त्यांसह शिवजयंती निमित्ताने दुःखद कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करून आणि रुपये 51 हजाराची आर्थििक मदत देऊन विजय वाघ च्या पत्नीस कुठेतरी रोजगार उपलब्ध करून देण्यासाााठी आम्ही प्रयत्नशील राहू असे अभिवचन देऊन पिता अशोक वाघ व कुटुंबाचे सांत्वन करूून त्यांचे आधार वड बनणारे सर्वश्री बंडूकाकाा बच्छाव ,सुनील आबा गायकवाड, नितीन भाऊ पोफळे आरपीआयचे नेते दिलीप भाऊ अहिरे व अन्य पदाधिकाऱ्यांचे मालेगाव महानगरात कौतुक केले जात आहे.शासनाच्या नियमांशी बांधील राहून अनाठायी खर्च करण्यापेक्षा अनाथ कुटुंबीयांना किंवा गरजूंना आर्थिक मदत करणे हीच खरीी शिवजयंती साजरी करणे आणि अशााच प्रकारचे कार्य महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांना अभिप्रेत होते ते आम्हीी केले असे बंडूकाका बच्छाव यांनी कसमादे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज” शी बोलताना सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.