देवळा येथे माय ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन संपन्न तालुक्यात होणार सीएनजी निर्मिती

0
18

 

देेेेवळा/ वासोळ : क स मा दे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _

देवळा येथे एमसीएल मिशन अंतर्गत माय अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचे उद्घाटन देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ आणि नायब तहसीलदार विजय बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले.
एमसीएल मिशन २०३० अंतर्गत मिरा क्लीनफ्युल्स लिमिटेड आणि माय अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड. तालुका देवळा व ग्रीनफिल्ड बायोफ्युल्स प्रायव्हेट लिमिटेड तालुका देवळा यांच्या संयुक्त विद्यमाने देवळा तालुक्यातील दहिवड येथे बायो सीएनजी व सेंद्रिय खत निर्मिती च्या प्रकल्पाची लवकरच सुरुवात होणार असून देवळा येथील बाजार समितीच्या कार्यालयाशेजारी पहिल्या मजल्यावरती साकारलेल्या कार्यलयाचे उद्घाटन देवळा तहसीलदार दत्तात्रेय शेजुळ,नायब तहसीलदार विजय बनसोडे, कृषी अधिकारी सचिन देवरे, वैभव चव्हाण शशिकांत पाटील पांडागळे,अशोक शिंदे,कैलास केदार,विलास घुगे,उत्तम नागरे,आशुतोष सपाटे,गोविंद सोनवणे,प्रमिला थविल यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सदर प्रकल्प हा शेतातील टाकाऊ कचरा, गिनी गवत व घरगुती कचरा या पासून जैविक इंधन, घरगुती गॅस व सेंद्रिय खत इत्यादीची निर्मिती करणार आहेत. या महत्वकांक्षी प्रकल्पापासून शेतकऱ्यांना निश्चितच आर्थिक लाभ मिळणार असल्याची माहिती देवळा माय अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत पिंगळे यांनी दिली तसेच
भविष्यात शेतीला व शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार आहेत व प्रकल्पाच्या माध्यमातून सभासदांना रोजगाराची संधी मिळणार असून जास्तीत जास्त लोकांनी सभासद व्हावे या प्रकल्पाविषयी माहिती करीता देवळा येथील कार्यालयाला भेट देण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
यावेळी देवळा माय अॅग्रो प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत पिंगळे,उपाध्यक्ष संदीप पवार,संचालक योगेश वाघ,पुंजाराम देवरे,रमेश पगारे,मधुकर व्यवहारे,बळवंत देवरे आदीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here