शेतकऱ्याने नाहीच केला पेरा तर…तर काय खाणार धतुरा ?

0
49

पुणे : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ संतोष शकुंतला आत्माराम बादाडे _ यांज कडून _

मैं भी आण्णा,मैं भी सावरकर
च्या टोप्या घालून हिंडणारे लोक..
मैं भी किसान नावाच्या टोप्या घालून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देतील का ? ज्यांचा बाप शेतकरी आहे, त्या पोरांनी तरी पेटून उठा..! शेतीक्षेञ हे सुद्धा भांडवलदारांच्या घशात जाऊ नये,,म्हणून पंजाब,हरियाणाचे शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.मला तर वाटते की शेतकरी फक्त पंजाब मध्येच आहेत भारतातील बाकी राज्यात नाहीत.शेतकरी असावेत तर पंजाबचे नाही तर आपले बसलेत महाराष्ट्रातील गाय छाप चघळत आणि मोदी साहेब कधी सहा हजार खात्यात टाकतोय त्याची वाट पहात..
आज पर्यंत मी म्हणत आलोय सरकारी नोकर व आमदार खासदार मंञी हे सर्व सरकारी तुकड्यावर जगणारे दलाल आहेत,त्यांना गरिब सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांशी काही घेणे देणे नाही,या सर्व दलालांकडून वारंवार शेतकरी, कामगार,गरिब कुटूंब सामान्य जनतेला लाठीचार्ज करुन तुरुंगात डांबले जाते,या सर्वाशी,आर्थिक हितसंबंध,ठेवता येणार
नाही..
देशातली परिस्थिती बघता,देशात अस्थिरता पसरवून मनुवादी हुकूमशाही लादत आहेत,यासाठी संविधानाची कायम छेडछाड चालू आहे,हे सगळं थांबवायचं असेल तर,पहिल्यांदा सत्तेतले ठेकेदार हटवावे लागतील,आणि हे ठेकेदार हटवायचे असतील तर आपल्याला पहिल्यांदा ईव्हिएम हटवावे लागेल,आणि आज जर भारतीय जनता ईव्हिएम हटवू शकली नाही,तर,येत्या
काळात संविधानही कुणीच वाचवू शकणार नाही..त्यामुळे गाफिल भारतीयांनी वेळीच सावध होण्याची गरज आहे.आणि जर संविधान वाचवू शकलो नाही,तर मग आपल्यालाही आणि कधीच वाचवू शकणार नाही..नीट आठवून पहा,प्रत्येक आंदोलन,विद्यार्थी,शेतकरी, कामगार,वन रँक वन पेन्शन,जेएनयु,नागरिकत्व कायदा,प्रत्येक आंदोलनाला हाताळण्याची पद्धत ठरलेली आहे.लोक दिल्लीत आंदोलन करतात.आंदोलकांना मिडीयाला हाताशी धरून आयटी सेलच्या माध्यमातून देशद्रोही वगैरे ठरवलं जात,समाजकंटक आंदोलनात घुसून पाकिस्तानी झेंडे फडकवतात,मग आंदोलनाला धार्मिक रंग दिला जातो,मग पोलिसांच्या वेषात कुणीतरी किंवा पोलीस बळाचा वापर करून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतात.हे सगळं घडताना महामहिम कुठतरी आपल्याच मस्तीत इव्हेंट करत फोटो काढून घेण्याची हौस पुरवतात..

“मी तुम्हांला अजिबात मोजत नाही” अस दाखवून आंदोलकांना तुच्छतेने दुर्लक्षित करतात.वाराणशी मधला दिव्यांचा इव्हेंट एवढ्याच साठी आहे..!शेतकऱ्यांनी आवाज उठवला तर भाजपच्या मते अन मंद भक्तांच्या मते आज शेतकरी आतंकवादी झाले अन शेतकऱ्यांच्या आंदोलनात पाकिस्तान जिंदाबादचे नारे लागले शेतकरी नक्षलवादी झालेत अन बऱ्याच साऱ्या अनेक उपमा कष्टकरी शेतकऱ्यांनाच्या वाट्याला आल्यात,देशातील शेतकरी आतापर्यंत शेतकरीहोता.भाजपच्या विरोधात आवाज उठवणारा शेतकरी सुद्धा आतंकवादी झाला..!
वेळोवेळी विद्यार्थी आंदोलन असो किंवा इतर आंदोलने जिथे जिथे सरकारच्या पाया खालील वाळू सरकायला लागते तिथे पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी झाली म्हणून बरेच फेक मेसेज बातम्या मुद्द्यांम दिल्या जातात.!भक्तांना जरी आज शेतकरी आतंकवादी किंवा नक्सल दिसत असतील मात्र त्यांच्या फेकू बापाला याची खात्री आहे की आपला निर्णय चुकला आहे तो जोपर्यंत तो मागे घेत नाही तोपर्यंत शेतकरी थांबणार नाहीत देशातील कानाकोपऱ्यातील शेतकरी आज नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधात आवाज उठवत आहेत.भक्त यांनी हे विसरू नये येणारा काळ हा शेतकरी कामगार कष्टकरी जनतेचा असेल जो यांच्या हुकूमशाही सत्तेला लाथ मारून मारून जमीनदोस्त करील..!
बेटी मारोगे तो बहू कहां से लाओगे
किसान मारोगे तो रोटी कहां से लाओगे
ईवीएम नहीं हटाओगे तो अच्छी सरकार कहां से लाओगे

शेतकऱ्यांनी स्वकर्तृत्वावर आज दिल्ली गदागदा हलवली.आज तुम्ही वेळेत शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले नाही तर भविष्यात तुम्हांला कुत्रं ही विचारणार नाही. सगळे कायदे शेतकरी विरोधी होतील. आणि नंतर देशपातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न कधीही सुटणार नाहीत… जागे व्हा.आपण कोणत्याही जातीचे,धर्माचे,किंवा राजकीय पक्षाचे असा,मतदान हि कोणत्याही राजकीय पक्षाला करा पण आपण शेतकऱ्यांचे लेकरं म्हणून,आपल्या काळ्या आईला वाचविण्यासाठी संघटीत होवून संघर्ष करु या.नविन शेतकरी व कामगार बिल आणण्यासाठी किती शेतकऱ्यांनी व किती शेतकरी,कामगार संघटनांनी आंदोलने केली होती..?
भलेही कृषीप्रधान देश फक्त नावापुरता गाजवा पण
नेते हो जगाचा पोशिंदा माझा मायबाप शेतकरी वाचवा..!
पिक विमा,अनुदान पोहचले नाही दारी
विकासाची गंगा ही कधीच वळली माघारी..!

शेतकऱ्यां ऐवजी ग्राहक सरंक्षण हिच राजकीय भूमिकेची माला
कारण ग्राहक शहरात अन् शहरेच तुमचा चुनावी जुमला..!
बी-बियाणे अन् खतासाठी करावी ऐन हंगामात वणवण
ढोर मेहनतीने पिकवलेलं सोनं शेवटी व्यापाऱ्यांचंच धन..!

धुर्त राजकारण्यांनी केले मदत निधीतही घोटाळे
बळीराजाचेच भांडवल तरी त्याचेच पध्दतशीर वाटोळे..!

चिघळलेल्या जखमांवर नको कुचकामी उपायांचा घाव
भीकही नको फक्त मागतोय शेतमालाला योग्य हमीभाव..!
त्याच्या वाट्यालाही लाभावं आत्मसन्मानांच जगणं
थांबवुन बळीराजाचा बळी शेतकरी वाचवा एवढंच मागणं…!
राााााा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here