अफवांवर विश्वास नका ठेऊ , मालेगावचे शुद्ध पाणी पिऊ – आयुक्त कासार

0
93

त्र्यंबक कासार ,आयुक्त मालेगाव ,मनपा

कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” साठी निलेश कासार

मालेगाव मनपा कडून पुरवठा होणारे पाणी पूर्णता शुद्ध – आयुक्त त्रंबक कासार, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये मालेगावचे शुद्ध पाणी आपण सगळ्यांनी पिऊ असे आवाहन मनपा आयुक्त त्र्यंबक कासार यांनी परसिद्धीपत्रकाद्वारे जनतेस केले आहे

मालेगाव महानगरपालिका पाणी पुरवठा विभागातील गिरणा धरण परिसरात दि.16/10/2020 रोजी पहाटेच्या सुमारास मासे मृत अवस्थेत आढळल्याचे निर्दशनास आल्यामुळे वरीष्ठ अधिकारींशी संपर्क साधुन त्यांचेशी झालेल्या चर्चे नुसार तातडीने गिरणा पंम्पींग स्टेशन वरील पंम्पीग तात्पुरते बंद करण्यात आले होते.
मालेगाव शहरातील गिरणा पंम्पीग स्टेशन (विना प्रक्रिया केलेले पाणी (RAW Water)), 71 एम.एल.डी. व 38 एम.एल.डी.जलशुध्दीकरण केंद्रावरील पाण्याचे नमुने तपासणी करणेचे आदेश देण्यात आले होते. मा आयुक्त  यांनी दिलेल्या आदेशान्वये दि.16/10/2020 रोजी सर्व जल स्त्रोतांचे नमुने तपासणी कामी मा.कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा, नाशिक. येथे पाठविण्यात आले होते.
आज दिनांक 23/10/2020 रोजी मा.कनिष्ठ वैज्ञानिक अधिकारी, जिल्हा आरोग्य प्रयोगशाळा,नाशिक. यांचे कडुन पाणी नमुने तपासणी अहवालामध्ये रॉ वॉटर फिल्टर (जलशुध्दीकरण) प्रक्रिया पुर्ण केल्या नंतर पाणी पिण्यास योग्य आहे असा अहवाल प्राप्त झाला आहे.

तरी मालेगाव महापालिकेच्या जलशुध्दीकरण केंद्रा मार्फत शहरास पिण्यासाठी पुरवठा करण्यात येणारे पाणी पुर्णता शुध्द असल्याने नागरीकांनी निश्चित रहावे व कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवु नये.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here