भारत पवार : राज्य मुख्यसंपादक ९१५८४१७१३१ बारामती : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : स्व.अजितदादा पवार यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेवर बारामती विधानसभा मतदारसंघात नुकतीच पोट निवडणूक घेण्यात आली. ह्या निवडणुकीत राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना शह देण्यासाठी २३ उमेदवारांनी लढा दिला पण …. ?
बारामती विधानसभा मतदारसंघातील पोट निवडणूक सुरुवातीला बिनविरोध पार पडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा प्रयत्न केले परंतु गुडघ्याला बाशिंग असणाऱ्यांनी त्यांचाही प्रयत्न हाणून पाडून निवडणूक रिंगणात उभे राहिले आणि तोंड काळे करण्या पलिकडे पदरात काहीच न पडल्याने निराशा पत्करून गप्प बसावे लागले.
दादांच्या निधनानंतर बारामती पोट निवडणूक निवडणूक आयुक्तांनी घोषित केली.सहानुभूती म्हणून बिनविरोध सुनेत्रा पवार यांना निवडून द्यावे असे काहीसे ठरले होते. परंतु उतावीळ असणाऱ्या महाशयांना मान्य नसल्या कारणाने सुनेत्रा पवार यांचे विरुद्ध अभिजित बिचुकले , आर. वाय.घुटुकडे, करुणा मुंडे यांचे सह १९ उमेदवारांनी उमेदवारी केली होती . मात्र मतदारांनी सुनेत्रा पवारांच्या पदरात घवघवीत मतदान टाकून त्यांचा दणदणीत विजय केला तर अन्य सर्व उमेदवारांना सणसणीत चपराक देऊन घरचा रस्ता दाखवून धोबी पछाड केले.
सुनेत्रा पवार यांना तब्बल २ लाख १८ ह.९३० इतकी मत पडल्याने त्यांचा दणदणीत विजय झाल्याने त्यांनी आजचा निकाल जाहीर होत असताना मनास आनंद तर होतोच परंतु आदरणीय दादांच्या आठवणींना उजाळा मिळाल्याने आपण सर्वजण भाऊक आहोत असे सांगताना आपल्या मतांमधून दाखवलेला विश्वासही आदरणीय अजितदादांच्या पवित्र स्मृतींना समर्पित करते.असे भाऊक विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.





